कात्रजच्या चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचे काम अतिशय वेगात चालू आहे,
या दोन मुख्य पिलर मध्ये एकूण १९ सेगमेंट बसवायचे आहेत त्यातील एका सेगमेंट चे वजन साधारण १५० टन आहे,
असे २ सेगमेंट आहेत व शिल्लक १७ सेगमेंट पैकी एकाचे वजन १२० टन आहे,
१९ पैकी आज रोजी ८ बसवून पूर्ण झाले आहेत…
हा पूल साधारण १३५० मीटर लांबीचा आहे तो पूर्णपणे सिक्स लेन आहे म्हणजेच या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलावर एकाच वेळेस साधारण १५०० गाड्या उभ्या राहू शकतील एवढी याची क्षमता आहे,
त्यामुळे कात्रज चौकातील कायमचे दुखणे असणारे अवजड वाहने या पुलावरच जातील त्यामुळे खालचा भाग शंभर टक्के वाहतूक कोंडी मुक्त होणार…
कोंढवा रोड कडून मुंबईकडे जाणारी वाहने शिवगोरक्ष मैदानासमोरूनच पुलावर जातील व मुंबई कडून सोलापूर कडे जाणारी वाहने वंडरसिटी पासूनच पुलावरती जातील त्यामुळे कात्रज चौकात वाहतूक कोंडी होऊ शकनार नाही आणि हे सर्व शक्य होत आहे ते तुमच्या सहकार्यामुळे असंच सहकार्य सर्व नागरिकांनी पुढील एक महिना सहकार्य करावे असे अहवान माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी केले आहे