*सूर्यकांत तळखंडे – सावनेर प्रतिनिधी *
सावनेर तालुक्या मध्ये झालेल्या संत्रा आणी मोसंबी फळ गळीमुळे शासनाकडून अनुदान देण्याकरिता करण्यात आलेल्या सर्वे मध्ये संबंधित सर्वे अधिकारी यांनी फळ गळीचे क्षेत्र कमी दाखविल्या मुळे मंगसा येथील शेतकऱ्यांनी तहसीदार सावनेर यांना निवेदन दिलेले आहे.
निवेदन मध्ये पुन्हा सर्वे करून फळ गळीचे क्षेत्र वाढवावे म्हणजे आम्हाला योग्य नुकसान भरपाई मिळेल या प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.
मंगसा येथील शेतकरी बांधवांच्या सांगण्यानुसार काटोल व नरखेड तालुक्या मध्ये अंशी टक्के फळ गळीची आराजी सर्वे मध्ये घेण्यात आलेली आहे.मग सावनेर तालुक्यात का नाही..? असा प्रश्न मंगसा येथील शेतकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून शासनाला विचारलेला आहे.
तहसीलदार सावनेर यांना निवेदन देते वेळेस मंगसा गावचे सरपंच भूमीराज रहाटे, मुनीराज धमदे, गेंदलाल महाजन,प्रकाश धुंदे,अनिल रहाटे,राजहंस मालापुरे व इतर पूर्ण मंगसा गावचे शेतकरी तहसील कार्यालय सावनेर येथे उपस्थित होते.