A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  'जयपूर डायलॉग्स - डेक्कन समिट पुणे २०२५' चे शनिवारी आयोजन*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  'जयपूर डायलॉग्स - डेक्कन समिट पुणे २०२५' चे शनिवारी आयोजन*

प्रेस नोट
पुणे,महाराष्ट्र
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत  ‘जयपूर डायलॉग्स – डेक्कन समिट पुणे २०२५’ चे शनिवारी आयोजन*

पुणे : हिंदुत्वाचा संदेश संपूर्ण भारतभर पसरवण्यासाठी जयपूर डायलॉग्स संस्थेच्या वतीने विविध माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्याचा एक भाग म्हणून पुण्यात येत्या शनिवारी ‘जयपूर डायलॉग्स – डेक्कन समिट पुणे २०२५ ‘ चे आयोजन करण्यात आले असून ‘एक है, तो सेफ है’ ही या समिटची थीम असल्याची माहिती  प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

जयपूर डायलॉग्स ही संस्था, हिंदू समुदायाची सुरक्षा आणि सामर्थ्य सुनिश्चित करण्यासाठी एकता ही गुरुकिल्ली आहे असे मानते.  हाच एकतेचा संदेश देण्यासाठी संस्थेच्या वतीने ऐतिहासिक महत्व असलेल्या, देशाची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात ‘जयपूर डायलॉग्स – डेक्कन समिट पुणे २०२५ ‘ चे आयोजन शनिवार, दि. ८ फेब्रुवारी २०२५  रोजी हॉटेल हयात, रिजन्सी येथे सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत करण्यात आले आहे.  या समिट मध्ये देशभरातील विचारवंत वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.

‘जयपूर डायलॉग्स – डेक्कन समिट पुणे २०२५ ‘ चे उद्घाटन दुपारी १२.१५  वा.  महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, त्यानंतर ‘एक है, तो सेफ है’  या विषयवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भाऊ तोरसेकर, संजय दीक्षित संवाद साधतील.

तत्पूर्वी  सकाळी ९.३०  वा. सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयवार चर्चासत्र होईल  यामध्ये  शेफाली वैद्य, राजेश कुमार सिंग, नीरज अत्री, प्रतीक बोराडे, सच्चिदानंद शेवडे सहभागी होणार आहे. अभिजित अय्यर मित्रा त्यांच्याशी संवाद साधतील. 

दुपारी १०.४५ ते  १२.५ वा.  ‘बटोगो तो कटोगे, दिल्ली निवडणुकीचे विश्लेषण/ हिंदूंना एकत्र करणे’  या विषयावर वरील चर्चासत्रात भाऊ तोरसेकर, बाबा रामदास, अश्विनी उपाध्याय, ओंकार चौधरी, अभिषेक तिवारी सहभागी होतील, त्यांच्याशी अनुपम मिश्रा संवाद साधणार आहेत. 

दुपारी ३  ते ४:१५ ‘भारत, भू-राजकारण आणि न्यू वर्ल्ड ऑर्डर भागीदारी, गटबाजी, हेडिंग आणि व्यापार’या विषयावरील चर्चेत अभिजित चावडा, कर्नल अजय रैना, अभिजित अय्यर-मित्रा, मेजर जनरल राजीव नारायणन, कर्नल आरएसएन सिंग यांचा सहभाग असून आदि अचिंत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. 

सायंकाळी ४.३० ते ६  या वेळेत भारतीय इतिहासाची शुभ्रता भारताचा खरा इतिहास परत आणणे – पण कसे? या विषयवार  विक्रम संपत, संदीप बालकृष्ण, रमेश शिंदे, फ्रँकोइस गौटियर, अविनाश धर्माधिकारी, संजय दीक्षित यांच्याशी नीरज अत्री संवाद साधतील.

शेवटच्या सत्रात ‘धार्मिक स्वातंत्र्य विरुद्ध धर्मनिरपेक्ष राज्य, हिंदु राष्ट्राच्या दिशेने पुढील पावले’ या विषयावर  राजा सिंह, कार्तिक गोर, विष्णू जैन, निसार अहमद शेख, भाऊ तोरसेकर, अनुपम मिश्रा यांच्याशी संजय दीक्षित संवाद साधणार आहेत.

VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Plot no.18/19,Flat no.201,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015

Back to top button
error: Content is protected !!