A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

*मुंबई-नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण, एक्सप्रेस वे *लवकरच* *सुरू होणार* *

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जाईल मु

दिपक पाटील ठाणे (शहापूर ):-*मुंबई-नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण, एक्सप्रेस वे *लवकरच* *सुरू होणार*
*
मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले मुख्यमंत्री यांचा ड्रीम प्रोजेक्ट मार्च महिन्यात सुरू होणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाला आहे. एक्सप्रेस वे सुरू झाल्यास मुंबई आणि नागपूर यादरम्यानचा प्रवास फक्त आठ तासांत पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा महामार्ग मार्च महिन्यात पूर्णपणे सुरू होणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण गेमचेंजर ठरेल. समृद्धी महामार्ग हा टप्प्या टप्प्याने सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्याचे पूर्ण झालेला आहे , मार्च महिन्यात हा महामार्ग प्रवासासाठी पूर्ण क्षमतेने गुढी पाडव्याला समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई ते नागपूर यादरम्यान 701किमीचा समृद्धी महामार्ग मार्च महिन्यात सुरू होणार आहे. सध्या इगतपुरी ते नागपूर यादरम्यान हा एक्सप्रेस वे कार्यरत आहे. अखेरचे 75 किमीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महाराष्ट्राच्या विकासात गेमचेंजर ठरणारा हा महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राला समर्पित करतील. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्ग मार्च महिन्यात सुरू होणार असल्याचा दुजोरा देण्यात आला आहे. सध्या इगतपुरी ते नागपूर हा 626 किमी पर्यंतचा महामार्ग सुरू आहे. समृद्धी महामार्गच्या अखेरच्या टप्प्यातील 75किमीचे काम पूर्ण झाले आहे, अखेरचं काम वेगात सुरू आहे. १० मार्चपर्यंत पूर्णपणे काम पूर्ण होईल.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जाईल

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे प्रवाशांचे तब्बल ८ तास वाचणार आहेत याआधी या प्रवासासाठी तब्बल १६ तास लागत होते. पुढे भविष्यात हा महामार्ग जेएनपीटी आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला होता. डिसेंबर २०२४ मध्ये अखेरचा टप्पा इगतपुरी-मुंबई सुरू होणार होता, पण महाराष्ट्र सरकारने काही बदल केल्यामुळे उशीर झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार , हा महामार्ग मार्च महिन्यात सुरू होणार आहे.
सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो. या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि इतर सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल.

Back to top button
error: Content is protected !!