A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

गुन्हेगारांची गुडघ्यावर धिंड काढत आंबेगाव पोलीस स्टेशनची कडक कारवाई

12 मार्च 2025 रोजी रात्री 23:30 दरम्यान पुणे, आंबेगाव पोलीस ठाणे हद्दीत दिग्विजय सोसा, आंबेगाव समोरील रोडवर स्वामीनारायण मंदिरातच्या मागे फिर्यादी वय- 19 वर्ष यास मोटरसायकलवरून कट मारण्याच्या कारणावरून वादविवाद होऊन आरोपिंने धारदार वस्तूने मारहाण केली. सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी तोडफोड, दंगा, मारामाऱ्या करणे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून दहशत माजवणारे सराईत गुन्हेगार गणेश जाधव, विशाल राऊत, समीर मारणे, ऋषिकेश लोके व इतर 20 ते 25 वयोगटातील गुन्हेगार आहे.

आंबेगाव पोलीस स्टेशनचे ए.सी.पी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद जिने, ए.पी.आय दोडमिसे, ए.पी.आय गोरे, पी.एस.आय कळमकर, पी.एस.आय कोळी, पी.एस.आय शिंदे, पी.एस.आय डोईफोडे, तसेच आंबेगाव पोलीस स्टेशन स्टाफ या पथकाने कारवाई करत कात्रज, संतोष नगर, सच्चाई माता चौक, पाण्याची टाकी, भगवा चौक, हनुमान नगर, शनी नगर, जांभूळवाडी रोड परिसरामध्ये अशा गुन्हेगारांची गुडघ्यावर धिंड काढून कडक कारवाई करत गुन्हेगारीकडे वळणाऱ्या प्रत्येकाला हा इशारा देण्यात आला. अशा या कारवाईला परिसरातील नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!