
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चंद्रपूर :- केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालय नई दिल्ली येथे दि. 3 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय पातळीवरच्या ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.प्रा.बबनरावजी तायवाडे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.
या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शप्रकाश साबळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश भागरथ वसंत भेरे , रेल्वेचे माजी अधिकारी कापरे व इतर पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.
ओबीसी समाजाच्या मागण्यांमध्ये जातनिहाय जनगणना, केंद्रीय पातळीवर ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय, 13 सप्टेंबर 2017 क्रिमिलियर ची मर्यादा वाढली नाही आहे, ती वाढवणे, अजूनही केंद्रीय आणि राज्याच्या कार्यालयात ओबिसीचे 27 टक्के आरक्षण पूर्ण पने पदे भरल्या गेले नाहीत ते भरण्यात यावेत, ओबीसी समाजातील शेतकरी व शेतमजुरांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना संयुक्त भारतरत्न पुरस्कार देणे, मंडल आयोग, स्वामीनाथन आयोग लागू करणे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षणनाचा कायदा लागू करणे. ओबीसींसाठी लोकसभा व विधानसभा असे दोन स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करणे. अशा विविध ओबीसी समाजाच्या मागण्या केंद्रीय पातळीवर मंजूर करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे निवेदन सादर करण्यात आले.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.