
11 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशन या नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली असून तेव्हापासून नवनिर्वाचित आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरू झाले होते. आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मिती होते वेळी पोलीस स्टेशनचे कामकाजाकरिता फक्त दोन रूम उपलब्ध होत्या व सदर दोन रूम मध्ये आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरू होते. पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम पूर्ण करण्यात आले असून आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पुणे पोलीस आयुक्त मा. श्री अमितेश कुमार यांच्या हस्ते फीत कापून व कोनशीला अनावरण करून दिनांक 23 5 2025 रोजी करण्यात आले.
यावेळी मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपायुक्त परिमंडल 2 पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, भारती विद्यापीठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक श्री. गजानन चोरमले, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वंजारी, स्वाती देवधर, भोजलिंग दोडमिसे, मोहन कळमकर, प्रतीकांत कोळी, युवराज शिंदे, मारुती वाघमारे, नीतीराज थोरात, सुरेश शिंदे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.