
पुणे: शिवशंभु प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महेशभाई कदम, वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन सदस्य विशाल अडागळे यांच्या माध्यमातून पुणे मनपा ॲडिशनल कमिशनर श्री ओमप्रकाश दिवटे यांच्याशी या कात्रज परिसरातील दुर्गंधीच्या तक्रारी संदर्भात घेतलेल्या पाठपुराव्यामुळे कात्रज किनारा हॉटेल समोरील रस्त्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य साठलेले पाणी, त्यामध्ये पडलेली घाण, कचरा यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामध्ये डेंगू, मलेरिया सारखे डास उत्पन्न होत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्यामुळे. याविषयी संबंधित आरोग्य विभाग आरोग्य निरीक्षक सौ प्रियांजली पवार, सौ कविता पाटील, जे इ श्री प्रशांत परदेशी, पथ विभाग कनिष्ठ शाखा अभियंता श्री कुणाल यादव यांनी कात्रज येथील लोकेशनवर भेट देऊन पाहणी करून तात्काळ या दुर्गंधीपासून नागरिकांना व सफाई कर्मचाऱ्यांना मुक्तता मिळण्यासाठी जे सी बी च्या साह्याने साफसफाईसाठी सुरुवात करून परिसर स्वच्छ करण्यासाठी कामात घेतले. तात्काळ या दुर्गंधीची साफसफाईचे काम हाती घेतल्याने स्थानिक नागरिकांकडून दुर्गंधी पासून मुक्तता मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात आला.
आरोग्य विभागाकडून स्थानिक नागरिकांना या ठिकाणी रस्त्यावर ये जा करत असताना कचरा टाकू नये असे आव्हान करण्यात आले आहे तसेच या ठिकाणी नागरिक कचरा टाकत असल्याचे आढळल्यास पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.