
अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद संघटन महासचिव महाराष्ट्र राज्य..
पाथर्डी- पंचायत समितीच्या भ्रष्ट आणि दादागिरीच्या कारभाराविरुद्ध सामाजिक युवा प्रतिष्ठान व आम आदमी पक्षाच्यावतीने गट विकास अधिकारी यांना दारूच्या बाटल्या, साडी चोळी भेट देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले.
पंचायत समितीच्या प्रशासनाकडून शेतकरी, नागरी व लाभार्थ्यांची मिळवणूक करून आर्थिक शोषण केले जात आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभमिळवण्यासाठी येथील काही अधिकारी व कर्मचारी लोकांकडून सर्रासपणे पैशाची मागणी करून घेत आहे. असा आरोप करत विविध योजनांमध्ये अधिकाऱ्यांना द्यावे लागणारे पैसे याचा लाच घेण्याचे रेट कार्ड आंदोलन करतांनी जाहीर करत आर्थिक स्वरूपाची लाज मागितली जात असून पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला आहे.
जे लोक पैसे देत नाही त्यांचे शासन योजनांचे प्रकरण अनेक वर्षापासून रखडले आहेत. धमकी देणाऱ्या विस्तार अधिकारी रानमळ याचे निलंबन करा, अशी मागणी करण्यात आली. यांची यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब पवार, आसाराम बटुळे, गुप्तवार्ताचे नागेश वाघ यांनी आंदोलन व पंचायत समिती प्रशासनामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावली.
या आंदोलनामध्ये अक्षय लक्ष्मण फुंदे, किसन आव्हाड, सुनिल पाखरे, संकेत बर्गे, बन्सी धाकतोडे, सचिन फुंदे, रामभाऊ फुंदे, खंडू फुंदे, शुभम फुंदे, अशोक बडे, आजिनाथ केदार, अविनाश दहिफळे, ओम फुंदे, ओमकार फुंदे, तुकाराम फुंदे, गणेश फुंदे, अक्षय फुंदे, तुषार फुंदे आदी उपस्थित होते. या आंदोलनाला गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे हे सामोरे गेले.