
Press Note
टवेपार, नंदगोपाल फाऊंडेशन
भंडारा
वृक्षारोपणा बरोबर वृक्ष संवर्धन आवश्यक – वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे
भागिरथा भास्कर हायस्कूल येथे वृक्षारोपण
भंडारा:- वृक्ष कटाईमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. वृक्ष लागवड करून जोपासणे काळाची गरज आहे. वृक्ष आपल्याला सर्व काही देत असते त्यांच्या शिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. त्या वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. सामाजिक वनीकरण विभाग आपल्या सोबत आहे. शक्य तेवढे सहकार्य आमचा विभाग करेल. नंदगोपाल फाऊंडेशन हा सामाजिक दायित्वातून सामान्य जनतेला जोडणारा संघटन आहे. त्यांच्या कार्याला सलाम व अभिनंदन करून वृक्षारोपण हा मानवाचा महत्वाचा घटक आहे. म्हणून वृक्षारोपणा बरोबर वृक्ष संवर्धन आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक वनीकरण विभाग भंडाराच्या वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे यांनी केले.
त्या टवेपार येथे नंदगोपाल फाऊंडेशन, सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र भंडारा व सुनंदा नर्सिंग कॉलेज भंडारा, भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन भंडारा, झाडे लावा झाडे जगवा उपक्रमांतर्गत व एक पेड मां के नाम भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपन करतांना रविवार दिनांक ३ ऑगस्टला करतांना बोलत होत्या.
वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपारचे मुख्याध्यापक वाय. सी. रामटेके होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदगोपाल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार, पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, सरपंच रिनाताई गजभिये, उपसरपंच प्रभुजी मते, पोलिस पाटील श्रीकांत मते, खोकरला ग्राम पंचायत सदस्य सुरेश घोडे, समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, दंत विभाग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनिष बतरा, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र भंडाराचे ए. टी. मेश्राम, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र भंडाराचे वनरक्षक रवि दहेकर व नंदगोपाल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी शाळेच्या वतीने सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे यांचा शाल व पुस्तक व पृष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी “ग्रीन भंडारा २.०” ह्या झाडे लावा झाडे जगवा उपक्रमांतर्गत विविध प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ.यशवंत लांजेवार यांनी सांगितले की, वृक्ष लावणे सोपे आहे. परंतु वृक्ष जगवणे कठीण आहे, फक्त वृक्षलागवडीचा इव्हेंट न करता वृक्ष जोपासण्याची जवाबदारी आपल्या मुलांप्रमाणे केली पाहिजे. माझं बाळ, माझं झाड ही संकल्पना राबविली पाहिजे,झांडाचा शत्रू दुसरा कोणी नसुन माणूसच आहे ,माणसांचा शत्रू सुद्धा माणुसच आहे.त्यामुळे प्रत्येक मनुष्याने वृक्ष आपला मित्र, मुलगा, नातेवाईक समजून वृक्षांची काळजी घ्यावी.
‘. माझे बाळ माझे झाड’ संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण कार्यक्रमात दोन ते तीन वर्षाचे उंच झाडांचे वृक्षारोपण करून त्याला संरक्षण करण्यासाठी पी. व्हि. सी पाईप चे कटघरे लावण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचे महत्वाच्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एच. सेलोकर व प्रास्ताविक कार्यक्रमाचे समन्वयक विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार एन. के. देशभ्रतार यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समन्वयक समीर नवाज, राहुल मेश्राम, एच. ए. झंझाळ, सरीन भोयर, भावेश बावनकुळे, मनोज लांजेवार, सुंदरलाल मेघवानी, सुहानी फुलबांधे, अनोद साठवणे, रविशंकर साकोरे, भाऊराव आगाशे, ए. झेड. शेंडे, ज्योती मलोडे, दिनेश हरडे, युवराज शामकुवर, प्रिन्सी बागडे, आरती वाढई, रिया कराडे, प्राची बघेले, प्रतिक्षा वालदे, जागृती कोसरे, तन्नु लुटे, माही पुडके, पुनम लुटे, आरती मेश्राम, श्रध्दा इलमे, अक्षरा मने, आस्थी तिजारे, पुर्वी ठवकर, दिव्या कातोरे, आरुषी कडव, वैष्णवी ठवकर, श्रावणी कोसरे, मुस्कान कडव, श्रध्दा लुटे, परिधी मते, सानिया मते, क्रांती लुटे, अवंतिका मने, स्विटी लुटे, कृतिका अतकरी व नंद गोपाल फाउंडेशनचे सदस्य, भागिरथा भास्कर हायस्कूल टवेपार, सामाजिक वनीकरण वन परिक्षेत्र भंडारा, भागिरथा भास्कर हायस्कूल, सुनंदा नर्सिंग कॉलेजचे अधिकारी/कर्मचारी, शिक्षक -शिक्षिका, विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहकार्य केले.
मुख्याध्यापक रामटेके सरांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले वृक्ष लागवड शाळेच्या पटांगणात केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
घोडे सरांनी सुद्धा वृक्ष लागवड करून जोपासणे काळाची गरज आहे. वृक्ष आपल्याला सर्व काही देत असते त्यांच्या शिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही असे सांगितले.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015