
पुणे: 5 ऑगस्ट 2025
वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज पुणे जिल्हा प्र. विशाल बाळासाहेब अडागळे यांनी पुणे महानगरपालिकेतील पथ विभाग, पुणे ट्राफिक पोलीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर कात्रज सातारा रस्त्यावर गंधर्व लॉन्स समोर रस्त्यावर मोठमोठे पडलेले खड्डे, रस्त्यावर साठणारे पाणी यामुळे वारंवार होणारे ट्राफिक जाम तसेच अनेक अपघात होत होते. या ठिकाणी सपाटीकरण व डांबरीकरण करून खड्डे बुजवण्यात आले.
याच कात्रज सातारा हायवेलगत गुजरवाडी फाटा येथे जवळच असलेले संत तुकाराम इंग्लिश मीडियम स्कूलकडून शाळेसमोर दोन्ही बाजूस गतिरोधक बनवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला वारंवार पत्र व्यवहार करून देखील दखल घेतली जात नव्हती व हे काम प्रलंबित होते. शाळेसमोरून हलक्या व अवजड वाहनाची आवक जावक मोठ्या प्रमाणात वेगाने असून अनेक अपघातही झालेले होते. विद्यार्थी व पालकांना बरोबर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, तसेच स्कूल व्हॅन यांना वेगाने आवक जावक करणाऱ्या वाहनांमधून धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागत होता. या वाहनांच्या वेग-मर्यादेला नियंत्रण आणण्यासाठी या ठिकाणी शाळेच्या दोन्ही बाजूला रंबल स्ट्रीप्स (वेग नियंत्रण पांढऱ्या पट्ट्या) आज बनवण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पुणे महानगरपालिका पथ विभाग शाखा अभियंता श्री. कुणाल यादव, पुणे ट्राफिक पोलीस डी.वाय.एस.पी श्री. हिम्मत जाधव, भारती विद्यापीठ ट्राफिक पी.आय श्री राजकुमार बरडे यांचे विशेष सहकार्याने गेली काही महिन्यांचे प्रलंबित काम काही दिवसातच पूर्ण करण्यात आले असून वन्दे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज पुणे जिल्हा प्र. विशाल अडागळे यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.