A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

महाराष्ट्र मिनी राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ चा यशस्वी समारोप चंद्रपूरात

यॉनेक्स-सनराईज स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती

 

IMG 20250916 WA0013

श्री संजय पारधी चंद्रपूर
चंद्रपूर : यॉनेक्स-सनराईज स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार स्मृती महाराष्ट्र मिनी राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा २०२५ (अंडर ९, अंडर ११ व अंडर १३) दिनांक १० ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हिल लाईन्स, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ही स्पर्धा चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन विकास संघटना (CDBDA) यांच्या वतीने व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (MBA) च्या अधिपत्याखाली यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून अनेक लहान व उदयोन्मुख खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडूंनी अप्रतिम खेळ, जिद्द आणि खेळाडूपणाचे दर्शन घडवले.
पुरस्कार वितरण सोहळा या समारोप प्रसंगी मान्यवर उपस्थित होते – श्री. देवराव भोंगळेजी, आमदार राजुरा विधानसभा मतदारसंघ, चंद्रपूर (मुख्य पाहुणे),श्री. एस.आर. अरुण विष्णू, प्रशिक्षक, भारतीय बॅडमिंटन संघ (२०१६–२०२५) (गेस्ट ऑफ ऑनर),सौ. अरुंधती पानतावणे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू,श्री. उमेश चांडक, अध्यक्ष, माहेश्वरी सेवा समिती व आरोग्यभारती,डॉ. कतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर,डॉ. चिंचोलकर, सिव्हिल सर्जन,श्री. अनिरुद्ध जोशी, रेफरी,श्री. गिरीश चांडक, अध्यक्ष, CDBDA,श्री. जोवेल चांदेकर, मानद सचिव, CDBDA,श्री. विरेंद्र जैस्वाल, संयुक्त सचिव, CDBDA तसेच आदित्य गलांडे, जवाहर पंजाबी, लक्ष्मीकांत आर.के., व विवेक वेखांडे आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण रु. २,००,०००/- इतक्या पारितोषिक निधीचे वाटप विजेते, उपविजेते व उपांत्य फेरीतील खेळाडूंमध्ये करण्यात आले. मुख्य पाहुण्यांचे विचार आ. श्री. देवराव भोंगळेजी यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत, राजुरा येथे आधुनिक दर्जाचे बॅडमिंटन हॉल उभारण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
विशेष उद्गार
• श्री. गिरीश चांडक, अध्यक्ष CDBDA यांनी सर्व खेळाडू, पालक व प्रशिक्षकांचे सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच या स्पर्धेबद्दल मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे भविष्यात अशा भव्य स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.• भारतीय संघाचे प्रशिक्षक श्री. एस.आर. अरुण विष्णू यांनी मुलांना प्रोत्साहन देत म्हटले:
“किदांबी श्रीकांत, सायना नेहवाल, एच.एस. प्रणॉय व पी.व्ही. सिंधू हे स्टार खेळाडूही एके काळी अशाच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळले होते. आज ते भारताचे प्रतिनिधित्व करतात, उद्या तुमच्यापैकी कुणीही तसे करू शकतो.”

स्पर्धेचे निकाल
मुलींची दुहेरी U13
🥇 ओवी पाटील (जळगाव) व श्रद्धा इंगळे (सातारा)
🥈 खानक झालानी व मायरा गोरेडिया (मुंबई उपनगर)
मुलांची दुहेरी U13
🥇 जतिन साराफ (पुणे) व श्लोक गोयल (पालघर)
🥈 जेडन मॅथ्यू (मुंबई उपनगर) व खुष दिक्षित (पुणे)
मिक्स्ड दुहेरी U13
🥇 योहान कल्याणी (नाशिक) व हॅझल जोशी (मुंबई उपनगर)
🥈 खुष दिक्षित व द्रुवी कुम्भेफळकर (पुणे)
मुलींची एकेरी U13
🥇 श्रद्धा इंगळे (सातारा)
🥈 द्रुवी कुम्भेफळकर (पुणे)
मुलांची एकेरी U13
🥇 जतिन साराफ (पुणे)
🥈 श्लोक गोयल (पालघर)
मुलींची दुहेरी U11
🥇 ख्रिशा गोयल व प्रिया अंबुर्ले (पालघर)
🥈 कैरवी कुलकर्णी (नाशिक) व सान्वी सूर्यवंशी (रायगड)
मुलांची दुहेरी U11
🥇 रुद्र मनोहर (पालघर) व वेदांत मोरे (पुणे)
🥈 अभिमन्यु शेटे (मुंबई उपनगर) व विवान वैंगंकर (ग्रेटर मुंबई)
मुलींची एकेरी U11
🥇 प्रिया अंबुर्ले (पालघर)
🥈 अग्रिमा राणा (पुणे)
मुलांची एकेरी U11
🥇 श्रियांश नायडू (नागपूर)
🥈 विवान वैंगंकर (ग्रेटर मुंबई)
मुलींची एकेरी U9
🥇 अनन्या मंगळेकर (नागपूर)
🥈 दिविता कापासी (मुंबई उपनगर)
मुलांची एकेरी U9
🥇 स्वरूप मांडे (अहिल्यनगर)
🥈 कीयर मांडे (अहिल्यनगर)
या भव्य स्पर्धेचा समारोप विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील खेळाडू व सर्व मान्यवरांच्या समूह छायाचित्राने झाला.
महाराष्ट्रातील बॅडमिंटन क्षेत्रातील आणखी एका यशस्वी पर्वाची नोंद या स्पर्धेने केली.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!