A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

योग नृत्य परिवार तर्फे स्वच्छता अभियान.

IMG 20251010 WA0007

संजय पारधी चंद्रपूर

चंद्रपूर : योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूरचे जनक भाई श्री गोपाल जी मुंदडा यांचे मार्गदर्शनात महानगरपालिका चंद्रपूर चे उप आयुक्त श्री संतोष गारगेलवार माझी नगरसेवक राहुल घोटेकर सुधीर बजाज युगल सोमानी दिनेश बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत इरई नदीच्या घाट राम सेतू पुलाजवळ स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.गणेश विसर्जन तसेच नवरात्र उत्सवातील नवदुर्गा मातेच्या मूर्ती या ठिकाणी विसर्जन करण्यातयेते त्यामुळे कचऱ्याचा ढीग प्रदूषण वाढते रोगरायची शक्यता असते तसेच आपण त्याची मनोभावे पूजा करतो त्याचे अवशेष पाहून मनाला दुःख होते सुंदर भारत स्वच्छ भारत या अभियानातून रोग मुक्त जीवनाच्या ध्यास घेत हा कचरा साफ करण्याचे ध्येय मनात बाळगून स्वच्छता अभियान राबवण्यात आले योग नृत्याच्या प्रभारी तथा मार्गदर्शक राधिका जी मुंदडा महिला प्रभारी किशोरीताई हिरुडकर मुग्धा खांडे चंदाताई घोडमारे यांच्या सहकार्याने चंद्रपुरातील सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख उपकेंद्र प्रमुख मंडल प्रभारी यांच्या नेतृत्वात 250 ते 300 योग साधक व योग साधिका यांनी उस्फूर्तपणे भाग घेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली योग नृत्य परिवारातर्फे अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात सर्वेजन अथक परिश्रम घेत यशस्वी ही करतात यातीलच हा एक भाग आहे नाश्ता चहा पाण्यानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.

 

Show More
Back to top button
error: Content is protected !!