बदलापूर प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे आमदार किसन कथोरे यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे मुरबाड विधानसभा मतदान संघामधून हजारो महिलांना त्र्यंबकेश्वर दर्शन घडविण्याचा संकल्प केला असुन आमदार किसन कथोरे हे आपल्या मतदासंघांमध्ये नेहमीच सक्रिय असतात त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदासंघातील त्यांची काम करण्याची पद्धत ही एक अनोखीच असते यामुळे या मतदासंघामध्ये आमदारांची वेगळीच छाप आहे
आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी मोफत त्र्यंबकेश्वर दर्शन यात्रा ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी उपलब्ध करून दिली आहे आपल्या आखाड्यातून सकाळी ७ वाजता बसेस जाऊन सायं ८ वाजेपर्यंत आणून सोडण्याची तसेच सहभोजनाची व्यवस्था केली आहे व ६ऑगस्ट ते १२ऑगस्ट पर्यंत यात्रेला जाणाऱ्या महिलांनी प्रवेश पत्रिका भरण्याची तारीख दिली आहे
नाशिक जवळील ब्रम्हागिरी पर्वताच्या पायथ्याशी गोदावरी तोरण बसलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेले एक पवित्र धार्मिक स्थळ तसेच स्वयंभू शिवमंदिराच जीर्णोद्धार तिसरे पेशवे बालाजी बाजीराव यांनी केला अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ त्र्यंबकेश्वर भोलेनाथाचे दर्शन जलभिषेक रुद्राभिषेक करण्याची मोफत संधी आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी करून दिली आहे तसेच महिलांचे या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना हि दिसून येतो