
पुण्यात पोलीस गस्त वाढवा नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश दिल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोहे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते.




