

संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्रा
बल्लारपूर : क्रीडा व कला संवर्धन मंडळ बल्लारपूर द्वारा आयोजित दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरीता दहाव्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन दिनांक 17 नोव्हेंबर 2024 ला करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये बल्लारपुरातील एकूण 12 शाळांनी सहभाग घेतला .यामध्ये एकूण 125 विद्यार्थ्यांचा सहभाग होता . दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरता घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल दिनांक 24 नोव्हेंबर 2024 ला कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रथम पुरस्कार रुचिता बोरकर व द्वितीय पुरस्कार भार्गवी कायरकर या विद्याश्री कान्वेंट च्या विद्यार्थिनीनी प्राप्त केला. तृतीय पुरस्कार के. जी. एन. कान्वेंट ची श्रेया मेश्राम ने पटकावला चतुर्थ पुरस्कार साईबाबा कॉवेन्ट चा आयुष सराटे ने मिळविला पाचवा पुरस्कार उत्कर्षा काटकर, सर्वोदय विद्यालय ला प्राप्त झाला. प्रोत्साहनपर पुरस्कार सरिता देरकर, रोहिणी सरोज, नयन बाम्बोले आणि सारा अंजुम या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला .पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता थापर हायस्कूलच्या पर्यवेक्षक नलिनी मॅडम उपस्थित होत्या .त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपला अभ्यास किती झाला याबद्दल माहिती मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी माध्यमाच्या माहिती तंत्रज्ञान या विषयाच्या शिक्षिका अदिती गहेरवार यांनी भूषविले . कार्यक्रमाचे संचालन गायत्री पाम्बी ने केले आभार प्रदर्शन ने केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.




