A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

बल्लारपूर टिंबर डेपो येथे म्युझियम व झायलरियम स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक – वनमंत्री गणेश नाईक

समीर वानखेडे ब्यूरो चीफ:
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर टिंबर डेपो येथे म्युझियम व झायलरियम स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्युझियम निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील बल्लारपूर टिंबर डेपो येथे टिंबर म्युझियम व झायलरियम स्थापन करणेसंदर्भात विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्धातास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते.

वनमंत्री नाईक म्हणाले की, बल्लारपूर येथील सागवान लाकूड हे संसद, श्रीराम मंदिर येथे वापरले जात आहे. त्यामुळे या लाकडाची माहिती जनतेला व्हावी, यासाठी हे म्युझियम स्थापन करण्यात येईल व त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल.

Back to top button
error: Content is protected !!