A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

आडगाव येथील प्रभाग दोनमध्ये 4 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

आडगाव येथील प्रभाग दोनमध्ये 4 कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ

प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर नाशिक:येथील प्रभाग क्रमांक २ आडगाव येथे चार कोटींच्या निधीतून होणार असलेल्या विविध विकासकामांचा प्रारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते झाला. यात अभ्यासिका बांधणे एक कोटी, मळे परिसर रस्ते खडीकरण-डांबरीकरण दोन कोटी, नेत्रावती नदीलगतच्या नाल्यावर पूल बांधणे-एक कोटी या कामांचा समावेश आहे. आमदार ढिकले म्हणाले, की गावात मोठी अभ्यासिका व वाचनालय नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विविध अडचणी यायच्या. 

     यासाठी एक कोटी इतका निधी मंजूर करून घेतला. लवकरच अद्ययावत व भव्य अशी अभ्यासिका विकसित होईल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. गावातील मळे परिसरात चांगले दर्जेदार रस्ते नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांना बराच त्रास सहन करावा लागत होता, यामुळे परिसरातील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी दोन कोटी निधी मंजूर करून घेतला आहे.

       लवकरच रस्त्यांची कामे पूर्ण होऊन शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण सोपे होईल. नेत्रावती नदीलगत पावसाळी नाल्यावर पूल बांधण्यासाठी एक कोटी निधी मंजूर केला आहे. लवकरच पुलाचे काम पूर्ण होईल. या सर्व कामांमुळे गावाच्या विकासात निश्चित भर पडेल.

      नाशिक पूर्व मतदारसंघात अनेक विकासकामे प्रगतिपथावर असून, आगामी काळात विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. मतदारसंघात नियोजनात्मक विकासकामे व्हावीत, हीच आपल्या सर्वांची अपेक्षा असते. त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन आमदार ढिकले यांनी दिले.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!