A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

उपवासाचे अन्नपदार्थ खाताना घ्या काळजी! अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

उपवासाचे अन्नपदार्थ खाताना घ्या काळजी! अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आहे. त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भगर, साबुदाणा, शिंगाडा पीठ व राजगिरा पीठ या पदार्थांचे सेवन केले जाते. हे पदार्थ खाल्यामुळे विषबाधा झालाच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ खाताना खबरदारी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले. त्यामुळे अन्न व औषध विभागाकडून नागरिकांसाठी काही सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.

१) सर्व पदार्थ घेताना ते पॅकबंद विकत घ्यावे.
२) त्याचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील तपासून घ्यावा.
३) त्या पदार्थाची मुदत केव्हा कालबाह्य झाली होती हे तपासून घ्यावे.
४) जास्त दिवस कोणतेही पदार्थ साठवून नये.
५) अन्न पदार्थ व घटक पदार्थ खरेदी करताना विक्रेत्याकडून बिल घेण्यात यावे.
६) शिळया अन्न पदार्थांचे सेवन करू नये म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.

दुकानदारांना सूचना
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने दुकानदारांनाही काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ विक्री करू नये.
काही आक्षेपार्ह आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन कर्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक:- (०७१२-२५६२२०४) वर तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!