
प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे अंतर्गत संचालित बार्टी प्रादेशिक कार्यालयाला आज आंध्र प्रदेशातील आमदारांच्या शिष्टमंडळानी सदिच्छा भेट दिली. तसेच
बार्टीच्या आयबीपीएस सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आंध्रप्रदेशातील मदाकासिरा अनंतपूर येथील आमदार एम. एस.राजू, नंदिकोटकुर कर्नूल येथील आमदार जयसुर्या, कोडमुर कर्नूल येथील बी.दस्तगीरी, पुथलपुत्तू चिलकुर येथील आमदार मुरली, पार्वतीपुरम विजयनगरम येथील आमदार विजया चंद्रा, आमदारांच्या या शिष्टमंडळाने बार्टी प्रादेशिक कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी सर्वांचे स्वागत केले. बार्टीची संशोधन आणि प्रशिक्षण योजनेची कार्यपद्धती समजावून सांगितली.
शिष्टमंडळाने बार्टीच्या अधिकाऱ्यांसह अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या घटकांसाठी बार्टीमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांवर चर्चा केली. यावेळी त्यांना बार्टी अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विविध संशोधन व प्रशिक्षण योजनांबद्दल माहिती देण्यात आली.
शिष्टमंडळाने बार्टी प्रादेशिक कार्यालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या आयबीपीएस सेंटरला भेट देऊन आयबीपीएस पूर्व प्रशिक्षण योजने संदर्भात माहिती जाणून घेतली. उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर