A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

◆ *घाटकोपर येथील एल बी एस मार्ग ते एन एस मार्ग सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे* ◆ रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल ◆ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याप्रकारची पाहणी केली गेली नसल्याचा आरोप

◆ *घाटकोपर येथील एल बी एस मार्ग ते एन एस मार्ग सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे* ◆ रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल ◆ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याप्रकारची पाहणी केली गेली नसल्याचा आरोप

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि

◆ *घाटकोपर येथील एल बी एस मार्ग ते एन एस मार्ग सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे*
◆ रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल
◆ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याप्रकारची पाहणी केली गेली नसल्याचा आरोप
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
सिमेंट-काँक्रीटचे रस्ते मजबूत व टिकाऊ असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र घाटकोपर येथील एल बी एस मार्ग ते एन एस मार्ग सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेले असून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पालिकेचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. हा रस्ता तयार करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याप्रकारची पाहणी केली गेली नसून, कंत्राटदाराने आपली मनमर्जी चालवत हा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कंत्राटदारावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
घाटकोपर पश्चिम येथील एल बी एस मार्ग ते एन एस मार्ग सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला मोठ्याप्रमाणात तडे गेले तडे गेले आहेत. ई-266 सांकेतांक क्रमांक असलेल्या या मार्गाच्या कामादरम्यान खोदकाम ही व्यवस्थीत झालेले नाही. रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सळ्या निकृष्ट दर्जाच्या वापरल्या गेल्या आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना सॅब ग्रेट, जी एस बी, डब्लयु एम एम ची सुध्दा काळजी घेतली गेलेली नाही. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते व नागरीकांनी केला आहे. याचाच परिणाम पाहता यारस्त्या तडे गेलेले आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होते व खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारे कोल्ड मिक्स आजपर्यंत फेल झाले आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च करुन मुंबईतील रस्ते सिमेंट-काँक्रीटचे बनवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. परंतू त्याच्या कामाच्या दर्जा पहाणी करण्याचा विसर पालिकेला पडला असल्याचे बोलले जात आहे.
2022-23 या वर्षांत सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यावर भर दिला असून यासाठी तब्बल 2,200 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, परंतू दर्जाचे का? या रस्ते कामाची तपासणी करून या ठिकाणी नवीन रस्ता बांधण्याची मागणी अभिजीत राणे युथ फाऊंडेशन ने केली आहे.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!