A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

◆ *मुंबई पोलिसांच्या बदल्या व बढत्या लाल फितीत अडकल्या!* ◆ मुंबई पोलीस खात्यात मोठ्याप्रमाणात अस्वस्थता व नाराजी ◆ शिपाई ते अधिकारी सगळेच संभ्रमावस्थेत!

◆ *मुंबई पोलिसांच्या बदल्या व बढत्या लाल फितीत अडकल्या!* ◆ मुंबई पोलीस खात्यात मोठ्याप्रमाणात अस्वस्थता व नाराजी ◆ शिपाई ते अधिकारी सगळेच संभ्रमावस्थेत!

प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
◆ *मुंबई पोलिसांच्या बदल्या व बढत्या लाल फितीत अडकल्या!*
◆ मुंबई पोलीस खात्यात मोठ्याप्रमाणात अस्वस्थता व नाराजी
◆ शिपाई ते अधिकारी सगळेच संभ्रमावस्थेत!
——–
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी वर्गामध्ये सगळेच संभ्रमावस्थेत असल्याचे चित्र आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे एप्रिल-मेदरम्यान होणाऱ्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या आणि बढत्या जुलै महिना संपत आला तरी अद्याप झालेल्या नाहीत. त्यामुळेे मुंबई पोलीस दलामध्ये सध्या मोठ्याप्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी आहे. शिपाई ते सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या रखडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे अनेक वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदाच्या बढतीसाठी ग्राह्य असलेले ‌‘सहाय्यक पोलीस आयुक्त‌’ बढती नाकारत असल्याचे समजते. गृहमंत्रालय, महासंचालक कार्यालय आणि आयुक्त कार्यालयातून बदल्या, बढत्यांच्या विलंबाची नेमकी कारणे समजत नसल्याने सगळेच संभ्रमावस्थेत असल्याने मुंबई पोलीस खात्यात चाललयं काय? असा प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारला जात आहे.
शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक, उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्तपदापर्यंतच्या बढत्या, बदल्या खोळंबल्या आहेत. पोलिस दलामध्ये सध्या दररोज बदल्या आणि बढत्यांची चर्चा सुरू असते. नेमके कारण माहीत नसल्याने पोलिस केवळ वेगवेगळ्या कारणांचा अंदाज व्यक्त करताना दिसत आहेत.
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढत्यांची यादी दररोज बदलत असल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी 189 पोलीस निरीक्षक या बढतीसाठी ग्राह्य होते. मात्र यातील काहींनी शक्कल लढवत आपल्या कार्यकाळातील एखादे प्रकरण विभागीय चौकशीसाठी जाणीवपूर्वक पुढे आणले. कागदोपत्री विभागीय चौकशीचा शेरा दिसत असल्याने त्यांना बढत्या देता येत नाहीत. बढतीसाठी ग्राह्य असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या 98 वर आली आहे.

वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!