A2Z सभी खबर सभी जिले कीUncategorizedअन्य खबरेमहाराष्ट्र

चार वर्षाच्या मुलीवर शाळेतच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर बंद

आंदोलन रेल्वे रुळांवर उतरून निषेध नोंदविला

बदलापूर प्रतिनिधी – कोलकत्ता मधील बलात्कार व हत्या प्रकरण ताजे असतानाच बदलापूरच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना घडली आहे शिशुवर्गातील शिकणाऱ्या चार वर्षाच्या एका बालिकेवर शाळेतील वर्गात अत्याचार झाल्याची घटना बदलापूर मध्ये घडली आहे तसेच आणखी एक बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे लघुशंकेसाठी जाताना शाळेतील कर्मचाऱ्यांनी हे घृनास्पद कृत्य केले आहे या प्रकरणी बदलापूर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे दोन्ही मुलींच्या वैद्यकीय तपासणीनंतर हे कृत्य उघड झाले आहे

समाजाला काळीमा फासणारा प्रकारामुळे बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला जात आहे त्या नरारामांना कठोर शासन करावे आशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे आज या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर बंदीची हाक दिली आहे त्या नराधमांना फासावर लटकावे अशी मागणीधरून नागरिकांकडून बदलापूर बंद ठेवण्यात आले असुन बदलापूरच्या सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बंदमध्ये शामिल झाले

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
बदलापूर मध्ये झालेल्या दुर्देवी आणि निंदनीय घटनेबाबत आज बदलापूर बंदची हाक दिली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद बदलापूरकरांनी दिला. बदलापूरमधील सर्व नागरिकांनी शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला. बदलापूर बंदमध्ये बाजारपेठे मधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 100 टक्के बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच रिक्षा-चालक मालक संघटनेने या बंदमध्ये सहभाग नोंदविला

नागरिकांकडून रेल रोको आंदोलन

आपल्या वेदना मुंबईपर्यंत पोहोचाव्या यासाठी नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन वरील रुळावरती उतरून रेल बंद आंदोलन सुरुवात केली सर्व नागरिकांचा एकच मत  नराधमांना फाशी झालीच पाहिजे असा घोषणा देत रेल्वे बंद पाडली

ठिकठिकाणी रस्त्यावरती टायर जाळून निषेध
स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील रस्त्यावरती नागरिकांनी टायर जाळून निषेध नोंदविला  पूर्व व पश्चिमेला जोडणारा रस्ता बंद पाडण्यात आला

बदलापूर मध्ये मोठा पोलीस-फौज फाटा
बदलापूर मध्ये प्रशासनाकडून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस-फौजफाटा दिसून येतो कारण बदलापूर मध्ये कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस-फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

संस्थेचीही केली तोडफोड

ज्या संस्थेमध्ये हा अनुचित प्रकार घडला त्या संस्थेची नागरिकांकडून तोडफोड करण्यात आली प्रशासनाने इतके दिवस हा प्रकरण का दाबून ठेवला असे म्हणत संस्थेची तोडफोड केली

खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार
आरोपीला अटक केली आहे
खटल्या विशेष सरकारी वकील नेमणार
दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आरोपीला अटक व संस्थेची चौकशी करण्याची सूचना दिल्या आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!