पुण्यामध्ये दोन महिन्यात चिकनगुनियाचे 400 रुग्ण
ससून रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांमध्ये कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये चिकुनगुनियाचे 400 रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात आंतररुग्ण विभागातील 801 रुग्ण, तर बाह्यरुग्ण विभागातील 416
अशा एकूण 1217 रुग्णांची चिकुनगुनियासाठी तपासणी करण्यात आली. बहुतांश रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, थकवा अशी लक्षणे दिसून आली आहेत. अर्धांगवायू, न्युरॉलॉजिकल गुंतागुंत अशी नवीन लक्षण आढळल्याचे प्रमाण नगण्य आहे.