

सुमिता शर्मा चंद्रपूर महाराष्ट्र:
भारत निवडणूक आयोगाने मतदार आणि उमेदवारांकरिता सी-व्हिजिल, सुविधा ॲप, ॲफिडेविट पोर्टल, व्होटर टर्नआऊट ॲप, व्होटर हेल्पलाइन ॲप, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता सक्षम ॲप, केवायसी ॲप आणि 1950 क्रमांकाची हेल्पलाईन आदी आयटी ॲप्लिकेशन्सच्या माध्यमातून सुविधा दिल्या आहेत, त्यांची थोडक्यात माहिती…
सी-व्हिजिल (cVIGIL)
सी-व्हिजिल हे ॲप हे आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्याकरिता एक अभिनव असे मोबाइल ॲप्लिकेशन आहे. ज्याद्वारे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या वेळी आपल्या स्मार्टफोनचा उपयोग करून छायाचित्रे, श्राव्य, किंवा दृक चित्रण अपलोड करता येते. ‘सी-व्हिजिल’ चा अर्थ ‘सतर्क नागरिक’ असा आहे. हे ॲप आता मराठी भाषेत पण उपलब्ध आहे.या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल झाल्यानंतर आचारसंहिता उल्लंघन झाल्याचे ठिकाण शोधण्यासाठी जी.पी.एस.चा उपयोग करता येतो.तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेवून 100 मिनिटांत स्थितीची माहिती देते.
सी-व्हिजिल ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक. गुगल प्लेस्टोअरमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil&hl=en_IN ॲपल स्टोअर https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541 वर उपलब्ध आहे.
सुविधा ॲप 2.0
भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहे. सुविधा 2.0 हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहे. त्याचबरोबर या अॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.
गुगल प्ले स्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp&pli=1 यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.







