संजय पारधी चंद्रपूर महाराष्ट्रा
बल्लारपूर :- दरवर्षी नोव्हेंबर च्या चवथ्या रविवारी NCC च्या वतीने राष्ट्रीय छात्र सेना दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या अनुषंगाने बल्लारपूर शहरातील स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात 21 महाराष्ट्र बटालियन च्या मार्गदर्शन मध्ये NCC दिवस आयोजित करण्यात आला NCC डे निमित्त पोस्टर आणि चित्रकला स्पर्धा कॅडेट्स साठी आयोजित करण्यात आली. कॅडेट्स नि बनवलेल्या पोस्टर आणि चित्रकला प्रदर्शनी चे उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बादलशाह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पंकज कावरे (ग्रंथपाल) आणि संजय कुबडे सर यांच्या हस्ते झाले. त्याच बरोबर कॅडेट्स ने बल्लारपूर शहरात NCC डे निमित्ताने रॅली काढण्यात आली. यात 40 कॅडेट्स नि सहभाग नोंदवीला. NCC डे निमित्त NCC अधिकारी लेफ्टिनेंट योगेश टेकाडे यांनी कैडेट्स ला मार्गदर्शन केले. NCC दिवस यशस्वी करण्यासाठी साठी कॅडेट अंजली निवलकर, कॅडेट निलेश महानंद, कॅडेट योगेश भटारकार आणि अन्य कॅडेट्स नि अथक परिश्रम घेतले.