A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील खुशबू आणि आयुषी यांची गोंडवाना विद्यापीठ खो खो संघात निवड.

 

WhatsApp Image 2024 12 09 at 08.52.49WhatsApp Image 2024 12 09 at 08.52.33

संजय पारधी चंद्रपुर, महाराष्ट्र
भद्रावती ( ता . ) स्थानिक भद्रावती येथिल विवेकानंद महाविद्यालय भद्रावतीतील विद्यार्थिनी खुशबू शेख आणि आयुषी मोहुर्ले यांची गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली खो खो संघात निवड झाली. गोंडवाना विद्यापीठ,महिला खो खो संघ दिनांक 16 ते 19 डिसेंबर 2024 ला राजस्थान येथिल गोविंद गुरु जनजातीय विश्वविद्यालय, बॉन्सवाडा येथे पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ महिला खो खो स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचा संघ सहभागी होणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचा संघ दिनांक 14 डिसेंबर रोजी चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून राजस्थान येथील गोविंद गुरु जनजातीय विश्वविद्यालय, बॉन्सवाडा येथे होणाऱ्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ महिला खो खो स्पर्धेकरिता रवाना होणार आहे. या संघात विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील खुशबू शेख आणि आयुषी मोहुर्ले या खेळाडू महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली महिला खो खो संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून गोंडवाना विद्यापीठने विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांची निवड करण्यात आली आहे. प्राध्यापिका संगीता आर बांबोडे यांच्या नेतृत्वात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली महिला खो खो संघ राजस्थान येथे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व आणि आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. महिला खो खो संघात विवेकानंद महाविद्यालयातील खुशबू शेख आणि आयुषी मोहुर्ले तसेच संघ व्यवस्थापक म्हणून प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांची निवड झाल्याबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमनभाऊ टेमुर्डे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. डॉ. राखुंडे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. डॉ. पारेल्लवार, प्रा. डॉ. सावे, प्रा. डॉ. तेलंग, प्रा. डॉ. खामनकर, प्रा. डॉ. काकडे, प्रा. ठाकरे, प्रा. मालेकर, प्रा. लांबट, प्रा. कापगते, प्रा, दाते, प्रा. बैरम, प्रा. खोके, प्रा. बेलगावकर, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!