A2Z सभी खबर सभी जिले कीउल्हासनगरकोल्हापुरथाणेधाराशिवनासिकपुणेमहाराष्ट्रमुंबईलातूरसंगमनेर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती धानोरे शाळेचे ११ विद्यार्थी विविध गुणदर्शन स्पर्धेत चमकले

 

वंदे भारत टीव्ही न्यूज करीता शहाजी दिघे

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील धानोरे येथील जि प प्राथ. शाळा दिघेवस्ती या आदर्श व उपक्रमशील शाळेने सात्रळ येथे पार पडलेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत ११ बक्षिसे पटकावत घवघवीत यश मिळवले आहे. हस्ताक्षर स्पर्धेत किलबिल गटात ओजस्वी सोमनाथ अनाप- द्वितीय क्रमांक , बालगटात स्वरा सोमनाथ भूमकर – द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत किलबिल गट- सार्थकी संतोष पाटोळे प्रथम क्रमांक ,बालगट- श्रेया शंकरराव हजारे- प्रथम क्रमांक, वेशभूषा स्पर्धा किलबिल गट- विहान ऋषिकेश भांबरे- द्वितीय क्रमांक,बालगट-उर्वी विजय दिघे -द्वितीय क्रमांक, वैयक्तिक गीतगायन किलबिल गट- संचित अजित शिंदे- प्रथम क्रमांक, बालगट श्रेया शंकरराव हजारे- द्वितीय क्रमांक, गोष्ट सादरीकरण स्पर्धा बालगट- वेदांत सोमेश्वर दिघे -द्वितीय क्रमांक, समूहगीत गायन स्पर्धेत लहान गट- प्रथम क्रमांक तसेच सांस्कृतिक स्पर्धेत लहान गट- प्रथम क्रमांक पटकावून शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे,राजेंद्र बोकंद, विद्याताई उदावंत, सुनिता ताजणे, मनिषा शिंदे,सोमनाथ अनाप व सरगम दिघे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, पालक, ग्रामस्थ तसेच गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. इंदुमती धट, केंद्रप्रमुख सौ. सरस्वती खराडे यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले आहे.

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!