माथेफिरूकडून संविधानाची विटंबना, परभणीत कडकडीत बंद
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची काच माथेफिरू दत्ता पवारने फोडल्याने संतप्त आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले. गाड्यांवर दगडफेक, रास्ता रोको आणि नंदीग्राम एक्स्प्रेस रोखण्यात आली. घटनेनंतर परभणीत कडकडीत बंद पाळला जात आहे. पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतले असून, कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.