राजुरा : मारोती काळे
राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील मारोती गणेश उलमाले या 25 वर्षीय युवकाने आज पहाटे 3.00 वाजताच्या सुमारास राहत्या घरात फाशी घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि तो मागील काही दिवसापासून कामाच्या शोधात होता परंतु त्याला काम मिळत नव्हते, घरात आर्थिक टंचाई, घरात आई सतत आजारी असायची, यामुळे तो पूर्णपणे खचून गेलेला होता. यामुळे त्याच्या मनावर मानसिक ताण वाढल्याने तो मद्याच्या आहारी गेला. घरची परस्थिती त्याला सांभाळणे कठीण झाले.त्यामुळे त्यांनी घरी कोणी नसल्यामुळे रात्री जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने पहाटेच्या 3.00 वाजताच्या सुमारास फाशी घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळ झाल्यानंतर घरशेजारी मोठे वडील आपले दुकानात जात असताना घराचा दरवाजा बंद दिसल्याने पाहते तर मारोती ने फाशी घेतल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलीस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष यांना माहिती दिली असता, त्यांनी ही माहिती पोलीस स्टेशन राजुरा यांना देण्यात आली. वृत्त लिहत असेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल व्हायचे होते.