
समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या आणखी एका प्रश्नासाठी पुढे सरसावले . धान खरेदीची मुदत 31 डिसेंबर 2024 ठेवण्यात आली आहे. पण, ही मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवून द्यावी, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता .
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत धान खरेदीची मुदत वाढविण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री.रणजितसिंह देओल यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा केली. या चर्चेनंतर प्रधान सचिवांनी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत वाढवून देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला होता. खरीप पणन हंगाम 2024-2025 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरीता दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. यासंदर्भातील नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे. त्यामुळे शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थांनी मुदतवाढीची मागणी केली आ, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्राद्वारे कळविले होते.
त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे दिसून येत आहे . काल 1 जानेवारी रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे .
शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे.
ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.
आ सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने धान खरेदी करिता मिळालेल्या मुदतवाढी साठी शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे .