9ea0f758-8233-45d9-a2a0-d6e062a49c1fजळगांव (राहुल खेवलकर):- जळगांव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर हेलमेट सक्ती करण्याचे आदेश मागच्या काही दिवसांआधी मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी काढले होते. त्यासंदर्भात मोठ्याप्रमाणात शाळा, महाविद्यालय आणि चौक चौकात जनजागृती करण्यात आली होती तसेच हेलमेट जनजागृती साठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आली होती. तसेच वृत्तपत्रातून देखील या संदर्भात नागरिकांना महामार्गावर हेलमेट परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज पोलीस प्रशासनांने अखेर हेलमेट परिधान न करणाऱ्या दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील जळगांव शहरातील जनता या कारवाईला विरोध करीत असल्याचे समोर आले असून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी देखील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या रोषाची आणि विरोधाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडण्यावर भर दिला आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी महिला आणि पुरुष कर्मचारी ही कारवाई पार पाडत आहे. नागरिकांनी हेलमेट परिधान करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित करावा आणि त्यासाठी सक्तीने हेलमेट परिधान कराव असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक मा. राहुल गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे जेणेकरून नागरिकांचा जीव सुरक्षित राहून अपघाताचा धोका कमी होईल. तसेच त्यांच्यावरील दंडात्मक कारवाईदेखील टाळली जाईल. सदर कारवाई कायमस्वरूपी सुरूच राहणार असून नागरिकांमध्ये हेलमेट जनजागृतीदेखील सुरू राहील असे सुतोवाच वाहतुक शाखेचे अप निरीक्षक शमाद तडवी यांनी केले आहे.
2,501 Less than a minute