
दिपक पाटील ठाणे प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महाननगर पालिकेच्या मांडा-टिटवाळा विभागातील अ प्रभाग हद्दीमधील बेकायदा बांधकामे रोखण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेऊन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त रोकडे यांना पालिका सेवेतून सोमवारी निलंबित केले. मागील पंधरा दिवसापासून रोकडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. अ प्रभाग हद्दीतील मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, उंभार्णी, वासुंद्री परिसरात बेसुमार बेकायदा चालीनंचे बांधकाम सुरू होते






