

:- नाशिक येथे पार पडलेल्या तीसरी राष्ट्रीय सिनयर तायक्वोंदो चॉम्पियनशिप 2024-25 या स्पर्धेत चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा शहरातील डिस्ट्रिक्ट तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपूर वरोराच्या खेळांडुनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तीन कास्य पदके प्राप्त केली.सदर स्पर्धेत देशभरातील 2000 खेळांडुनी सहभाग घेतला होता.यात सचिन शंकर बोधाने,आकाश अरविंद भोयर,अक्षय विनोद हनमंते यांनी तायक्वोंदो या स्पर्धेत पुमसे या प्रकारात तीन कास्य पदके प्राप्त केले या खेळाडुनी आपल्या यशाचे श्रेय (NIS प्रशिक्षक व आंतराष्ट्रीय मेडलीस्ट खेळाडु) श्री.बजरंग वानखडे सर व आई वडीलांना दिले. डिस्ट्रिक्ट तायक्वांदो असोसिएशन ऑफ चंद्रपूरच्या कमेटी शुभेच्युक-पोद्दार इंटरनेशनल स्कुल चे विदर्भ व्यवस्थापक विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा सचिव – श्री अमन टेमुर्डे सर, आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोराचे शारीरीक शिक्षण व क्रिडा विभागप्रमुख प्रा.श्री तानाजी बायस्कर सर, माजी सैनिक पैरा कमोंडो व सचिव एअरबोर्न तायक्वोंदो ट्रेनिंग सेंटर वरोरा- श्री सागर कोहळे सर, पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक (NIS कोच कुस्ती)- श्री मुकेश पांडे सर, वरोर्यातील प्रति्ष्टीत व्यापारी-श्री महेश भिवदरे सर,सिविल इंजिनियर व तायक्वोंदो खेळाडु वरोरा-श्री पंकज चौधरी सर यांनी यश प्राप्त केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडुचे शहरात सर्वत्र कौतुक केले व शुभेच्छा दिल्या .










