A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आले.

संजय पारधी बल्लारपूर महा.
बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय इंग्रजी माध्यम वाणिज्य शाखेद्वारा छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 395 वी जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे एनसीसी विभागाचे प्रमुख प्रा. योगेश टेकाडे तसेच महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ. पंकज कावरे , कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक प्रा. कृष्णा लाभे , हिंदी विषयाच्या शिक्षिका दिव्या वर्मा आणि माहिती तंत्रज्ञान विषयाच्या शिक्षिका अदिती गहेरवार उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . मान्यवरांनी आपापल्या मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन वयाच्या चौदाव्या वर्षी मावळ्यांना सोबत घेऊन अनेक किल्ले जिंकले तसेच त्यांच्या जीवनात महिलांना मातृत्वाचे स्थान होते असे पाहुण्यांनी आपल्या संभाषणात सांगितले. यानंतर आभार प्रदर्शन झाले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button
error: Content is protected !!