
दिपक पाटील शहापूर ( ठाणे) गेले काही दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे. आज ठाणे जिल्हाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. काही तालुक्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. तर काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. बदलत्या वातावरणाचा शेती, भाजीपाला फळबागांना वीट भट्टी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
कडक उन्हाळ्यात पाऊस आल्याने काही ठिकाणी थंडावा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पाऊस झाल्याने व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पुन्हा एकदा राज्याला अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
Discover more from Vande Bharat Live Tv News
Subscribe to get the latest posts sent to your email.