
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
चंद्रपूर :- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे – बल्लारशाह 31.4 कोटी रुपये, चंद्रपूर 25.5 कोटी रुपये, चांदा फोर्ट 19.3 कोटी रुपये, अजनी स्टेशन 297.8 कोटी रुपये, नागपूर जं. 589 कोटी रुपये, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. 17.4 कोटी कोटी रुपये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य आणि पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ, इत्यादी. तसेच, उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे, जसे की – अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड इत्यादींचा समोवश आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय मंत्री श्री.वैष्णव यांचे आभार देखील मानले. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे. मुर्तिजापूर स्टेशन 13 कोटी रुपये, बडनेरा 36.3 कोटी रुपये, भंडारा रोड 7.7 कोटी रुपये, गोंदिया 40 कोटी रुपये, तुमसर रोड 11 कोटी रुपये, टिटवाळा 25 कोटी रुपये, शेगाव 29 कोटी रुपये, सेवाग्राम स्टेशन 18 कोटी रुपये, धामणगाव स्टेशन 18 कोटी रुपये, हिंगणघाट स्टेशन 22 कोटी रुपये, पुलगाव स्टेशन 16.5 कोटी रुपये, वाशिम स्टेशन 20.3 कोटी रुपये, मलकापूर स्टेशन 19 कोटी रुपये, गोधनी स्टेशन 29 कोटी रुपये, काटोल स्टेशन 23.3 कोटी रुपये, कामठी स्टेशन 7.7 कोटी रुपये, नरखेड जं. स्टेशन 37.6 कोटी रुपये खर्चून विकास होणार आहे.