


दी.15/04/2025 (अनिल खैरनार ठाणे जिल्हा प्रमुख)डोंबिवली शहरातील विविध ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वि जयंती मोट्या उत्साहाने साजरी करण्यात आली. डोंबिवली शहरात पहिल्यांदा जयंतीची सुरुवात सिद्धार्थ नगर येथून करण्यात आली होती. त्या उद्धेशाने सिद्धार्थ नगर जयंती उत्सव समिती चे आयोजन मा.विकास खैरनार यांच्या नेतृत्वा खाली आयोजन करण्यात आले होते. सादर जयंती निमित्त लहान मुली यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नृत्य सादर करून दाखवण्यात आले व संविधान देखील मिरवण्यात आले.जयघोष करत जयंती ची सुरुवात निळा झेंडा दाखवून करण्यात आली.ह्या वेळी रॅली मध्ये विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.मोरे साहेब,मा.माणिक उघडे( ठाणे प्रदेश उपाध्यक्ष रिपाई आठवले)तसेच सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक मा.विकी हिंगे साहेब, कामगार नेते मिसाळ, सामाजिक कारकर्ते मा.मुकुंद गरुड.संजय खैरनार, मनोज बैसाणे,विजय आखाडे,विश्वा गरुड,वैशाली सावर्डेकर,अक्षय खेडकर,उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत मा.विकास खैरनार(डोंबिवली शहर अध्यक्ष युवक आघाडी रिपाई आठवले)यांनी पुष्पगुच्छ व निळ्या मफलरी देऊन करण्यात आले.