
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठकडून जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने भाजप जैन प्रकोष्ठाच्या महानगरपालिका निवडणूक नियोजन समितीची पहिली बैठक महावीर प्रतिष्ठान, पुणे येथे पार पडली.
प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी निवडणूक तयारीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनबांधणी, प्रचार आराखडा आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या तयारीचा प्रारंभिक आराखडा ठरवण्यात आला असून, भविष्यात याबाबत अधिक सविस्तर नियोजन बैठका घेतल्या जाणार आहेत.
बैठकीस भाजपा जैन प्रकोष्ठ शहर अध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथा, जिल्हाध्यक्ष भरत भुरट, जिनेन्द्र कावेडिया, श्रीमल बेदमुथा, राजेश सालेचा, अभिजीत शहा, मुकेश राजावत, मयूर सरनोत, अल्पेश गोगरी, किरण रामसिना, दिनेश मेहता, देवेंद्र मेहता, वर्षा पाटील, विपेश सोनीग्रा, कुंतीलाल चोरडिया, कल्पेश मेहता, प्रमोद छाजेड उपस्थित होते.
जेठमल मुथा वंदेभारत लाईव्ह टीव्ही न्युज पुणे