A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरे

श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूरची विद्यार्थी चैतन्या राऊत ने पटकावले CBSE झोनल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य पदक व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

सुमिता शर्मा:
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे पार पडलेल्या CBSE झोनल लेव्हल बॉक्सिंग स्पर्धेत श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूर विद्यालयातील विद्यार्थी चैतन्या राजेश राऊत हिने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) पटकावले आहे. ही स्पर्धा CBSE बोर्ड अंतर्गत झोनल स्तरावर एमडीएन फ्युचर स्कूल लाखनी भंडारा येथे दिनांक 26 जुलै ते 29 जुलै 2025 ला घेण्यात आली होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शाळांनी सहभाग घेतला होता.
चैतन्याने U-17 वयोगटात 60-63 वजनगटात दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिला थोडक्याच फरकाने सातारा जिल्ह्यातील खेळाडू बरोबर सामना खेळताना पराभव पत्करावा लागला, मात्र तिच्या चपळ हालचाली, मजबूत पंच आणि खेळातील आत्मविश्वास यामुळे तिने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धा संपल्यानंतर चैतन्या जेव्हा शाळेत परतली, तेव्हा तिचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. शाळेच्या प्राचार्या सौ. श्रीलक्ष्मी मूर्ती यांनी आपल्या भाषणात चैतन्याच्या यशाचे कौतुक करीत सांगितले, “चैतन्या ही अतिशय मेहनती, शिस्तप्रिय आणि क्रीडाप्रेमी विद्यार्थी आहे. तिचा हा संघर्ष आणि जिद्द चैतन्याला रोहतक हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे,तिथे देखील चैतन्या पूर्ण जिद्द व चिकाटीने सहभाग घेईल हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे हे अभिमानाने शाळेच्या प्राचार्या ने सांगितले आहे.”तसेच तिचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.उपप्राचार्या निशा मेहता यांनी देखील तिच्या प्रशिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले. “विद्यार्थ्यांचे यश हे केवळ त्यांचे नसून संपूर्ण शाळेचे, शिक्षकांचे आणि पालकांचेही असते. चैतन्याने हे सिद्ध केले आहे.”
शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही चैतन्याला शुभेच्छा दिल्या व तिच्याशी संवाद साधत प्रेरणा घेतली. चैतन्याच्या कुटुंबीयांनचे शाळेत आभार मानले की त्यांनी तिच्या खेळाला सतत पाठिंबा दिला.सदर खेळाडूला मार्गदर्शक म्हणून शाळेतील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख दिनेश कोयचाडे, रुपेश बोढे, संजय पारधी , रुचिता आंबेकर , पायल ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
चैतन्याचे हे यश केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चैतन्या ने जेवढी मेहनत केली, त्याचा फळ म्हणून हे यश तिला लाभले. आता तिचे संपूर्ण लक्ष्य राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाठण्याचे आहे.
त्याकरिता गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक , सचिव दत्तात्रय कंचर्लावार यांच्यासह सर्व सदस्य तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीलक्ष्मी मूर्ती आणि उपप्राचार्या निशा मेहता तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यानी खेळाडूंचे अभिनंदन केले .

Back to top button
error: Content is protected !!