
वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा
राजुरा : आज दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे बल्लारपूर–विसापुर मार्ग तसेच विसापुर–हडस्ती माना मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील अपर वर्धा धरण तसेच इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे वर्धा नदीतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैभव जोशी यांनी नागरिकांना नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच सुरक्षित स्थळी स्थलांतरित राहावे, असे आवाहन केले आहे.
[yop_poll id="10"]