
पुणे: 23 ऑगस्ट 2025, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेमध्ये झालेल्या आर्थिक गैर व्यवहारापरप्रकरणी योगेश चौकशी करून दोशींवर कारवाई करण्याची मागणी. मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्य पुणे श्री दीपक तावरे यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात तक्रारीची दखल घेऊन श्री शिकलकर व श्री विकास हादवे यांच्या तक्रारीनुसार सदस्य समिती नेमून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते. व त्याचा अहवाल देखील तयार झाला होता परंतु राज्यमंत्री पंकज भोईर गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार महाराष्ट्र शासन यांनी या अहवाला स्थगिती दिल्यामुळे सदर करेल व्यवहारांमध्ये खूप काही मोठे गोड बंगाल होत असल्याचे तक्रारदार अकबर शिकलकर यांनी संशय व्यक्त केला आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याने पत्र व्यवहार आंदोलने करून सुद्धा या घोटाळ्यावर पडदा टाकण्यासाठी प्रशासकीय अनाधिकृत हस्तक्षेप होत असल्याने या ठिकाणी न्याय मिळण्याची अपेक्षा नसून न्यायासाठी हायकोर्टामध्ये (पीआयएल) जनयाचिका दाखल करण्याचेही आव्हान या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून श्री अकबर शिकलकर यांनी दिले.










