[pj-news-ticker]

A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025

निवडणूक विभाग व निर्वाचक गणाची प्रभाग रचना प्रसिद्ध

चैनल से जुड़ने के लिए इमेज पर क्लिक करें

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

राजुरा :- चंद्रपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व त्याअंतर्गत पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागासाठी निवडायची सभासद संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक विभाग 56 व निर्वाचक गणाची प्रभाग रचना 112 आहे. निश्चित केलेल्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचनेचे अंतिम परिशिष्ट 8 (अ) व 8 (ब) मधील अधिसुचना व अनुसूची तयार करून ती शासन राजपत्रात 22 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयातील सुचना फलक / संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीकरीता निवडायची सदस्य संख्या चिमूर (जि.प. – 5 सदस्य, पं.स. – 10 सदस्य), नागभीड (जि.प. – 4, पं.स. – 8), ब्रम्हपुरी (जि.प. – 5, पं.स. – 10), सिंदेवाही (जि.प. – 4, पं.स. – 8), भद्रावती (जि.प. – 4, पं.स. – 8), वरोरा (जि.प. – 5, पं.स. – 10), चंद्रपूर (जि.प. – 5, पं.स. – 10), मुल (जि.प. – 3, पं.स. – 6), सावली (जि.प. – 4, पं.स. – 8), पोंभुर्णा (जि.प. – 2, पं.स. – 4), गोंडपिपरी (जि.प. – 3, पं.स. – 6), बल्लारपूर (जि.प. – 2, पं.स. – 4), कोरपना (जि.प. – 4, पं.स. – 8), जीवती (जि.प. – 2, पं.स. – 4) आणि राजुरा (जि.प. – 4, पं.स. – 8) अशी करण्यात आली आहे.

[yop_poll id="10"]
Back to top button
error: Content is protected !!