A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेमहाराष्ट्र

जनहिताच्या कामांवर भर देऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

राविराज शिंदे भारतीय पत्रकार अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य सचिव 

अहिल्यानगर, प्रतिनिधी

दि. १५ – अधिकारी व संबंधित विभागांनी सुरू असलेली व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावीत. जनहिताच्या कामांवर भर देऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

अहिल्यानगर तहसील कार्यालयात झालेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) शिरीष वमणे, पोलीस उपअधीक्षक (शहर) दिलीप टिपरसे व तहसीलदार संजय शिंदे उपस्थित होते.

 

बैठकीत पिण्याचा पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, सिंचन प्रकल्प, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, ग्रामविकास योजना, स्वच्छ भारत मिशन व कृषी क्षेत्रातील प्रगत उपक्रम अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.

 

तसेच, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

Back to top button
error: Content is protected !!