A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबरदेशमहाराष्ट्रलाइफस्टाइल

मालेगाव ऍग्रो डीलर असोसिएशन तर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मालेगाव ऍग्रो डीलर असोसिएशन आयोजक मयूर वांद्रे मित्र मंडळ यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

मालेगाव, प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर :– येथील मालेगाव ऍग्रो डीलर असोसिएशन, आयोजक मयूर वांद्रे मित्र मंडळ, एकात्मता चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

       यावेळी मयूर वांद्रे, अविनाश निकम, अप्पा निकम नवल पवार कॅम्प पोलीस स्टेशन चे पवार साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली. याप्रसंगी सूत्रसंचालन करणारे अतिशय लहान वय परंतु वक्तृत्व अतिशय मोठ्या माणसाप्रमाणे असणाऱ्या खंडेराव भामरे यांचा श्री त्र्यंबक कासार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बक्षीस देण्यात आले.

      याप्रसंगी रमेश उचित, ऍड किशोर त्रिभुवन,विवेक पाटील,किशोर चौधरी,चंद्रशेखर बच्छाव, प्रकाश सावंत,दगडू पवार,राजु पवार,अनिकेत कासार, नवल पवार,आनंद जोगदंड,रमेश मिस्तरी,रघुवीर परदेशी,निखील चव्हाण, महेश शिवदे,शंकर शिवदे,विकास जाधव,सिद्धार्थ मगरे,अरुण येवले, एकनाथ पगारे,जवाहर शर्मा , दिलीप गांधी,बिपीन पटाईत,अमोल मोरे,नवल पवार,चेतन गुंजाळ, सागर शिंदे,गिरीश पाटील,अद्वयेत कन्नल, कुणाल शिंदे,आकाश पाटील,जीवन खैरनार,ऍड मुकुल शिंदे,खंडेराव भामरे,दर्शन वाघ,साहिल चौधरी, विशाल महाले आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!