A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*कसबे तडवळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*…

*कसबे तडवळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*…

प्रेस नोट
कसबे तडवळे गाव,धाराशिव

*कसबे तडवळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*…

कसबे तडवळे गावासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण ठरावा असे यश मिळाले आहे. कसबे तडवळे येथील सुपुत्र शोएब खलील शेख यांची *CGST and Central Excise* या अत्यंत प्रतिष्ठित व जबाबदारीच्या सेवेत निवड झाली असून, त्यामुळे तडवळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लावला गेला आहे.

शोएब खलील शेख यांची ही निवड त्यांच्या अथक परिश्रमाची, चिकाटीची आणि ध्येयावर असलेल्या अढळ विश्वासाची पावती आहे. कठोर अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्याने हे यश संपादन केले. स्पर्धेच्या या कठीण काळात त्याने मिळवलेले हे यश अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

CGST and Central Excise सारख्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळणे ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून, संपूर्ण गावासाठी गौरवास्पद आहे. शोएब याच्या या यशामुळे तडवळ्याचे नाव राज्याबरोबरच देशपातळीवर उज्वल झाले आहे. त्याच्या या यशात कुटुंबीयांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रपरिवाराचे पाठबळ यांचे मोलाचे योगदान आहे.

शोएब खलील शेख यांची ही भरारी येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांनी आपल्या कार्यातून देशसेवेला नवे आयाम द्यावेत, हीच अपेक्षा.
शोएब खलील शेख यांचे हार्दिक अभिनंदन!
तडवळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणाऱ्या या यशाला मानाचा मुजरा!
लिखान सौजन्य – बाळासाहेब जमाले सर मित्र परिवार

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!