A2Z सभी खबर सभी जिले कीअन्य खबरेताज़ा खबर
Trending

◆ *मध्यप्रदेशातून येणारा पावणे 2 कोटींचा राज निवास व जाफरानी जर्दा गुटखा जप्त* ◆ नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाची कारवाई

◆ *मध्यप्रदेशातून येणारा पावणे 2 कोटींचा राज निवास व जाफरानी जर्दा गुटखा जप्त* ◆ नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाची कारवाई

Press note
Nagpur pratinidhi
◆ *मध्यप्रदेशातून येणारा पावणे 2 कोटींचा राज निवास व जाफरानी जर्दा गुटखा जप्त*
◆ नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाची कारवाई

आयजी पथकाने राज निवास व जाफरानी जर्दाने घेऊन महाराष्ट्रात येणाऱ्या कंटेनर पाठलाग करून आयजी पथकाने बहाणपूर चौफुलीजवळ सिनेस्टाईलने पकडला. थेट आयजी पथकाने कारवाई केल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. महाराष्ट्रात गुटखा बंदी असतांना मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होते. मध्यप्रदेशातून दोन ते तीन कंटेनर तर, गुजरात राज्यातून सिमावर्ती चाळीसगाव-धुळे-अमळनेर येथे कोट्यावधीचा माल उतरवला जातो.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना मध्यप्रदेशातून गुटख्याचे कंटेनर (एचआर 55 एक्यू 3873) एक कोटीचा गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. उपनिरीक्षक अरुण भिसे, तुषार पाटील. विक्रांत मांगडे, विजय बिलगे, प्रमोद मंडलिक, सुरेश टोंगारे यांच्या पथकाने मुक्ताईनगर मार्गे जिल्ह्यात शिरतांना रात्री दिडच्या सुमारास पाठलाग करुन कंटेनर थांबविला.
कंटेनरच्या तपासणीत 1 कोटी 61 लाख 17 हजार 800 रुपयांचा राज निवास व जाफरानी जर्दा गुटखा आढळला. चालक सतीश शर्मा (रा. दिल्ली) त्यागी रा. जयपुर व त्यांचा हस्तक मुबारक (रा. दिल्ली) व कंपनी मालक नीलू पंजाबी उर्फ निशू (रा. भिवाडी, राजस्थान) यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिवसा आड जळगाव जिल्ह्यात गुजरात आणि मध्यप्रदेशातून कोट्यावधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी करण्यात येते. स्थानिक पोलीस, अन्न व औषध प्रशासन किरकोळ विक्रेत्यांवर गुन्हेदाखल करुन समाधानी असतांना थेट नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकाने कारवाई केल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर या कारवाईने प्रश्न उपस्थित होत आहे.

Vande Bharat live tv news nagpur
Reporter Devashish Tokekar

Back to top button
error: Content is protected !!