बल्लारपुर पोलीसांनी केला मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश; ५ दुचाकी सह ७ इंजिन जप्त, चार आरोपींना अटक बल्लारपूर :- बल्लारपुर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पर्दापाश केले असून त्यांचा कडून ५ दुचाकी सह ७ इंजिन जप्त केले. चोरी गेलेल्या दुचाक्या बल्लारपूर पोलीस ठाणे , राजूरा पोलिस ठाणे व चंद्रपूर शहर पोलीस ठाणे येथील असून ४ आरोपींना अटक केले असून आणखी चोरी गेलेल्या दुचाक्या मिळण्याची शक्यता आहे. शहरातून या वर्षी अंदाजे ३० दुचाकी चोरी गेले आहेत. २२ सप्टेंबर रोजी फिर्यादी अजय रामसागर बेन्नी वय ३७ वर्षे रा. कादरीया मस्जिद चौक बल्लारपुर चंद्रपुर याने पोलीस ठाणे बल्लारपुर येथे येवुन मोटार सायकल चोरीची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी मोटार सायकल चोरी व आरोपीचा शोध घेत असता ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे माहिती मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारा आरोपी संशयीत रित्या वस्ती परिसरात फिरत आहे. त्यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव प्रिन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया वय-२० वर्षे रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर जि. चंद्रपुर असे सांगितले वरुन त्यास मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता. त्याने मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन ०२ मोटार सायकल काढुण दिल्या त्यास अधिक विचारपुस केली असता. त्याने सांगितले की, मी माझा मित्र सुरेश ऊर्फ सुर्या कैलाश हरणे वय २० वर्षे रा. श्रिराम वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांचेसह मिळुन मौजा बामणी व आंबेडकर वार्ड बल्लारपुर परिसरातुन मोटार सायकल चोरी केली आहे. त्या मोटार सायकल त्याचा मित्र पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद वय ३० वर्षे रा. रामनगर सास्ती झेंडा वस्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर याला विक्री केल्याचे सांगितले. त्याचा कडून ३ मोटार सायकल जप्त केले. त्यानंतर आरोपी प्रिन्स उर्फ कालू ची अधिक विचारपुस केली असता. त्याने आणखी मोटार सायकल त्याचा मित्र सुर्या हरणे, लवकुश ऊर्फ डु निशाद मिळुन पोलीस ठाणे राजुरा व पोलीस ठाणे चंद्रपुर शहर तसेच पोलीस ठाणे बल्लारपुर येथुन चोरी केलेल्या मोटार सायकल भगतसिंग वार्ड येथिल आरोपी तौकीर तौहिद शेख वय २७ वर्षे व्यवसाय मोटार सायकल गॅरेज रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यास दिल्याचे सांगुन त्याचेकडे घेवुन गेला. त्यावेळी त्याचेकडे मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले तेव्हा त्याचे मोटार सायकल गॅरेजची पाहणी केली असता पुर्ण मोटार सायकलचे स्पेअर स्पॉर्ट खोलुन दिसले. त्यातील ०३ मोटार सायकल इंजिन ची पाहणी करुन त्याबाबत विचारपुस केली असता त्याने चोरीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास आणखी विचारपुस केली असता त्यांने काही इंजिन भंगार दुकानदार नामे जावेद यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्यास भंगार दुकान येथे आणुन भंगार दुकानाची पाहणी केली असता भंगार दुकानात ०४ मोटार सायकल इंजिन संशयीतरित्या मिळुन आल्या. याबाबत भंगार दुकानदार जावेद यास विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीचे असमाधानकारक उत्तर दिल्याने सदर मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याची शहानिशा करुन पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे. आरोपी नामे प्रिंन्स ऊर्फ कालु संग्राम बहुरीया रा. सरदार पटेल वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन फॅशन प्लॅस मोटार सायकल क्र.एम.एच.३४ झेड ११४०, एक काळ्या रंगाची बजाज प्लसर मोटार सायकल क्र.एम.एच.३४ ए.एस.५२३७; आरोपी नामे पुतीलाल ऊर्फ हनी बाबुलाल निशाद रा. रामनगर सारती ता. राजुरा याचे ताब्यातुन काळया रंगाची हिरो कंपनीची स्लेंडर मोटार सायकल क्र.एम.एच.३४ बी.जे.५९३७, काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल क्रं.एम.एच.३४ झेड.३१२८, काळया रंगाची हिरो होंन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लॅस मोटार सायकल क्रं.एम.एच.३४ ऐ.जे.५७५१ ; आरोपी नामे तौकीर तौहीद शेख वय २७ वर्षे रा. भगतसिंग वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन मोटार सायकलचे सुटे भाग एकुण-०३ इंजीन जप्त करण्यात आले असुन त्यामधील ०२ इंजिन पोलीस ठाणे बल्लारपुर येथील गुन्हयातील आहेत व ०१- पोलीस ठाणे राजुरा येथील आहे. भंगार दुकानदार नामे जावेद वय वर्षे रा. गणपती वार्ड बल्लारपुर याचे ताब्यातुन मोटार सायकलचे बजाज कंपनीचे सुटे भाग एकुण-०४ इंजीन जप्त करण्यात आले असुन त्याची शहानिशा करणे सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे, सपोनि. अंबादास टोपले, पोउपनि. हुसेन शहा, सफौ. गजानन डोईफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. सत्यवान कोटनाके, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा. संतोष दंडेवार, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, मपोअं. अनिता नायडु इ. स्टॉफ यांनी केली आहे.