A2Z सभी खबर सभी जिले की

रामनगर येथे सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर संपन्न

*रामनगर येथे सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर संपन्न*
——————————————————– *मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन*

गडचिरोली (दि. ३० सप्टेंबर २०२५) :
पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या “सेवा सुशासन, गरीब कल्याण – सेवा पंधरवडा” कार्यक्रमा अंतर्गत गडचिरोली शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिर परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी मा.खा.डॉ. नेते यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करत “शुगर, बी.पी. यांसारख्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,” असे आवाहन केले.

या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री गीताताई हिंगे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके यांच्यासह विनोद देवोजवार, संजय मांडवगडे, कविता उरकुडे, सीमा कन्नमवार, अल्का पोहनकर, भावना हजारे, भारती खोब्रागडे आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी मा.खा. डॉ. नेते यांनी रामनगर येथील माँ दुर्गा देवीचे दर्शन घेऊन जय माँ बाल दुर्गा मंडळाला सदिच्छा भेट दिली.

Back to top button
error: Content is protected !!