A2Z सभी खबर सभी जिले कीLok Sabha Chunav 2024अन्य खबरेताज़ा खबर
Trending

आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त* *श्री रुख्मिणी मातेच्या पादुकांचे श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे प्रस्थान*

*आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त*
*श्री रुख्मिणी मातेच्या पादुकांचे श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे प्रस्थान*

दरवर्षी प्रमाणे आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सोहळा दिनांक २जुन रोजी संपन्न होणार आहे त्या निमित्त जगत्मता आई श्री रुख्मिणी मातेच्या पादुका श्री क्षेत्र मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे दिनांक १ जुन रोजी सकाळीं ६.०० वाजता श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून प्रस्थान करणार आहे मार्गात अमरावती येथे सकाळचा चहा नाष्टा श्री अविनाशराव देशमुख रामनगर पाठ्यपुस्तका जवळ, दुपारी अकोला येथे श्री हभप शंकर पाटील बोर्डे महाराज ,कौलखेड येथे भोजन व विश्राम ,नंतर दुपारी ४.०० वाजता श्री डॉ विठ्ठलराव साधू ज्योती नगर , जाठरपेठ यांचे कडे पादुका पूजन व दुपारचा चहा नाश्ता, सायंकाळीं ६.०० वाजता मुक्ताईनगर साठी प्रस्थान रात्री ८.३० वाजता श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथे आगमन व मुक्काम . दिनांक २ जुन सकाळी संत मुक्ताई मंदिरात पादुका पूजन नंतर श्री पंढरीश पांडुरंगाच्या पादुकांचे आगमन झाल्यावर श्री पांडुरंग व रुख्मिणी मातेच्या पादुकांचे मुक्ताई नगर मंदिरात वाजत गाजत आगमन व पूजन नंतर नामदेव महाराज ह्यांचे वंशज नामदास महाराज यांचे कीर्तन ,महाप्रसाद व नंतर श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे प्रस्थान पालखी सोहळ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानं चे उपाध्यक्ष श्री वसंतराव डाहे,विश्वस्त श्री सुरेशकाका चौहान,श्री अशोकराव पवार, विणेकरी श्री विठोबाची बागडे,वारकरी श्री श्याम श्रीराव, स्वप्नील जमखुटे,देशमुख,श्री रोशन,श्री तिडके महाराज सहभागी होणार आहेत

Back to top button
error: Content is protected !!